Video : आधी पुराच्या पाण्यातून घेतली डॅशिंग एन्ट्री नंतर पोलिसांनी दिला दडुक्यांचा प्रसाद

 उडावाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला दडुक्यांचा प्रसाद दिला आहे

Updated: Jul 23, 2022, 10:46 PM IST
Video : आधी पुराच्या पाण्यातून घेतली डॅशिंग एन्ट्री नंतर पोलिसांनी दिला दडुक्यांचा प्रसाद title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : जीव धोक्यात घालून पुरातून जाणाऱ्या एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. नसते धाडस केल्यामुळे या व्यक्तीला पोलिसांनी दंडूक्याचा प्रसाद दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग अंधारी नदीच्या पुरामुळे ठप्प झाला होता. या महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी थांबवण्यात आली होती. या महामार्गावर दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त असताना एका व्यक्तीने पुराच्या पाण्यातून दुसऱ्या बाजूला जाण्याचे धाडस केले.
 
या व्यक्तीने पुराच्या पाण्यातून चालत- चालत पूल ओलांडला. दुसर्‍या बाजूला गेल्यावर पोलिसांनी पुराच्या पाण्यातून चालत येण्याचे कारण त्या व्यक्तीला विचारले. यावर त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. नसते धाडस केल्यामुळे पोलिसांनी  त्या व्यक्तीला दंडूक्याचा चांगलाच प्रसाद दिला.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात गेले दहा दिवस अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशाप्रकारे जीव धोक्यात घालून पुरातून प्रवास करणे धोकादायक असल्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. मात्र तरीही याला न जुमानता नागरिक विनाकारण पूराच्या पाण्यात उतरत जीव धोक्यात घालत आहेत.