कुणाल जमदाडे, झी मीडिया
Police Raped On Women: राहुरी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस उपनिरीक्षकानेच (Police) महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून राहुरी पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नऱ्हेडा असं आरोपीचे नाव आहे. या प्रकरणाने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Police Raped On Women In Rahuri)
जमीन खरेदीत फसवणूक झाल्या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याचसंदर्भात तपासाचे काम सुरु असताना आरोपीने महिलेला वेळोवेळी त्रास दिला. तसंच, तिला धमकावून घरी नेत बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. राहुरी तालुक्यातील महिलेच्या फिर्यादीवरुन कलम 376 क (ब) व कलम 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस उपनिरीक्षक तिला वेळोवेळी व्हॉट्सअॅप कॉल व चॅट करुन धमकी देत असे. तसंच, धकमी देऊन वेळोवेळी अत्याचार केल्याने पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे.
पीडित महिला जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार देण्यासाठी देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यात गेले होती. त्यावेळी त्यांनी त्यांची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक नऱ्हेडा यांच्याकडे सांगितली. मात्र त्यानंतर नऱ्हेडा यांनी पीडीत महिलाला खासगी प्रश्न विचारले. तसंच, तुमचं काय केल्यावर मला काळ मिळेल? असा प्रश्न केला. त्यावर महिलेने तुम्हाला पन्नास हजार रुपये देईन, असं सांगितले. मात्र त्याने त्यावर मला काय पाहिजे' ते तुम्ही समजून घ्या, असं म्हणाले. यानंतर त्यांना असे काहीही बोलू नका असं म्हणून पीडितेने काढता पाय घेतला, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
पीएसआय नऱ्हेडा यांनी व्हॉट्सअॅपवर मेसेज करुन वेळोवेळी तू खूप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर असे संदेश पाठवून जबरदस्ती केली. व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज पाठवून रुमवर नेत बळजबरीने अत्याचार केले, असं महिलेने तक्रारीत म्हटलं आहे.