खान्देशमध्ये ठसकेबाज खिचडीचा पाहुणचार

खान्देशचा पाहुणचार म्हणजे चमचमीत.... झणझणीत...... तिथल्या खिचडीमध्येही तसाच ठसका

Updated: Nov 3, 2017, 08:20 PM IST
खान्देशमध्ये ठसकेबाज खिचडीचा पाहुणचार  title=

खान्देश : खान्देशचा पाहुणचार म्हणजे चमचमीत.... झणझणीत...... तिथल्या खिचडीमध्येही तसाच ठसका...... मुळात खिचडीसाठी लागणारे सगळेच जिन्नस अगदी सहजपणे स्वयंपाकघरात उपलब्ध असतात.... तेलात कांदा, टॉमेटो, शेंगदाणे, मसाला,  आलं, कोथिंबीर पतून एक उकळी आली की त्यात तांदूळ आणि तूरडाळ एकत्र शिजवायची.... चार शिट्ट्या झाल्या की गरमागरम खिचडी तयार..... त्यामुळे खान्देशच्या घरी आयत्यावेळी आलेला पाहुणाही उपाशी परतत नाही. 

खान्देशातल्या जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या पट्ट्यात कुणाकडे पाहुणे म्हणून गेलात तर आवर्जून खिचडीचा पाहुणचार मिळतो... ताटात खिचडीसोबत लोणचं, पापड, काकडी, कांदा, मुळा अशी भट्टी जमली तर लईच भारी..