बोनससाठी पीएमपीएल कर्मचारी रस्त्यावर

बोनससाठी पीएमपीएल कामगार अखेर रस्त्यावर उतरले आहेत. बोनस नाकारल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगार पीएमपीएलच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे.

Updated: Oct 12, 2017, 11:25 PM IST
बोनससाठी पीएमपीएल कर्मचारी रस्त्यावर  title=

पुणे : बोनससाठी पीएमपीएल कामगार अखेर रस्त्यावर उतरले आहेत. बोनस नाकारल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगार पीएमपीएलच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे.

कामगार न्यायालयाने बोनस देण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, या निर्णयाला पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी हायकोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे.

कामगारांच्या आशा आता शुक्रवारी होणाऱ्या पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीवर आहेत. संचालक मंडळात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि आयुक्त संचालक आहेत. 

संचालक मंडळात बोनस देण्याचा निर्णय झाल्यास कामगारांना बोनस मिळू शकतो.