पीएमपीएलच्या ताफ्यात येणार ८०० बस

पुण्यातील पीएमपीएलच्या ताफ्यात येत्या दीड वर्षात ८०० बसेसची भर पडणार आहे.

Updated: Aug 16, 2017, 10:51 PM IST
पीएमपीएलच्या ताफ्यात येणार ८०० बस  title=

पुणे : पुण्यातील पीएमपीएलच्या ताफ्यात येत्या दीड वर्षात ८०० बसेसची भर पडणार आहे. पीएमपीएलची सेवा दर्जेदार करण्यासोबतच तोटा कमी करण्यासाठीच्या उपाययोजना पीएमपीएल राबवणार आहे. पीएमपीएल मधून विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांना रोखण्यासाठी त्यांच्या दंडाची रक्कम 3 पटीनं वाढवण्यात आलीय. विनातिकीट प्रवास करणा-या प्रवाशांकडून आतापर्यंत फक्त 100 रुपये दंड आकारला जायचा. यापुढे मात्र त्यासाठी ३०० रुपये मोजावे लागणार आहेत.