गावकरी आणि ग्रामपंचायतीचा पुढाकार, शाळा झाली डिजीटल

शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे.

Updated: Aug 16, 2017, 10:11 PM IST
गावकरी आणि ग्रामपंचायतीचा पुढाकार, शाळा झाली डिजीटल title=

अमरावती : शिक्षण विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना गळती लागली आहे. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी अमरावती जिल्ह्यातील सालेपूरच्या गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घेतलाय. जिल्हा परिषदेच्या शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं त्याचा फायदा गावातील विद्यार्थ्यांना होतोय.

केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीवर गावक-यांनी भर दिला त्यामुळे विद्यार्थी ई लर्निंगचे धडे घेत आहेत. विद्यार्थ्यांना याचा चांगलाच फायदा होताना दिसतोय. सालेपूर ग्रामपंचायतीनं १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेची दुरुस्ती, रंगरंगोटी केली.

शाळा डिजीटल झाल्यामुळे विद्यार्थीही आता आनंदानं शाळेमध्ये येत आहेत. प्रत्येक गावानं शिक्षणासाठी राखीव निधीचं योग्य नियोजन केलं तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया नक्कीच पक्का होईल.