धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदार आणि आमदारांशी मोबाईलवरून संवाद साधला. या संवादासाठी लोकप्रतिनिधींना कशी कसरत करावी लागली याचा प्रत्यय धुळे जिल्ह्यात पहायला मिळाला. रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल हे बुराई नदी परिक्रमेला असतांना सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणीच पंतप्रधान मोदीचां कॉल आला. त्यामुळे मंत्री महोदयांना कार्यक्रमादम्यानच मोदींचा कॉल उचलावा लागला. जयकुमार रावलांनी मोबाईल स्पीकर मोडवर टाकून मोदींचा संदेश उपस्थितांना ऐकवण्याचाही प्रयत्न केला.
मात्र मोबाईलमधून आवाज पुरेसा येत नसल्यानं. नंतर जयकुमार रावलांनी स्पीकर मोड बंद करत. स्वतःच पंतप्रधानांचा संदेश ऐकला. या संदेशात मोदींनी उद्या प्रत्येक मतदारसंघात खासदारांना एक दिवसाचं उपोषण करण्याच्या सूचना दिल्या. विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे संसदेत अनेक प्रश्न मांडता न आल्याचा मुद्या लोकांना पटवून देण्याचं मोदींनी आपल्या संदेशात सांगितलं.