PM Modi Applauds Surekha Yadav: देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं (Female Loco Pilots in India) आणि हुशारीनं विविध क्षेत्रात नावं कमावले आहे. सध्या अशाच एका महिलेची सर्वत्र चर्चा आहे आणि त्यांचे नाव आहे सुरेखा यादव (Surekha Yadav). वंदे भारत ही ट्रेन चालवण्याचा मान त्यांना मिळाला आहे. सध्या त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. महिला या विमान चालवतात, ट्रेनही चालवतात तेही अगदी आत्मविश्वासानं. त्यामुळे प्रत्येकाला त्यांचा अभिमान हा वाटतोच. आज महिला या अनेक क्षेत्रात आघाड्यांवर आहेत. त्यामुळे त्यांच्या जिद्दीला सलाम द्यावा तेवढंच कमी आहे. त्यातीलच एक आहे त्या म्हणजे सुरेखा यादव (Surekha Yadav Struggle Story). खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे. चला तर मग जाणून घेऊया सुरेखा यादव यांच्याविषयी.
आपल्या देशात अशा अनेक महिला आहे ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली नसतानाही त्यांनी मोठ्या प्रमाणात यश संपादन केले आहे. येत्या काही वर्षांमध्ये महिलांना मोठी आघाडी मारली आहे त्यातील एक म्हणजे सुरेखा यादव आहेत. सुरेखा यांनी आपल्या करिअरची सुरूवात 1989 साली केली. तेव्हा त्या सहायक चालक होत्या. त्यानंतर त्यांनी 1996 साली मालगाडीही चालवली होती. तेव्हा त्यांनी हजारो किलोमीटरचं अंतर पुर्ण केले होते. या क्षेत्रात त्या काळी महिला लोको पायलट यांची संख्या प्रचंड कमी होती त्यातून आता कुठे या क्षेत्राला एक मोठी भरारी मिळते आहे. त्यातून तेव्हा त्या काळी सुरेखा यादव यांनी या करिअरला धाडसानं आणि आत्मविश्वानं सुरू केली होती.
या क्षेत्रात सोप्पं असं काहीच नाही. रेल्वे ट्रॅफिक, दुरचा प्रवास आणि त्याचबरोबर सिग्नलचे पालन करावे लागते. 2010 मध्ये त्यांनी घाट चालक म्हणूनही काम पाहिले होते. त्यानंतर त्यांना डेक्कन क्विनमध्ये नोकरी मिळाली. 2019 मध्ये त्या वंदे भारत एक्सप्रेससाठी रूजू झाल्या. त्यांची पहिली ट्रेन ही नवी दिल्ली-कानपूर-अलाहाबाद-वाराणसी (Vande Bharat Express Route) या मार्गे होती.
— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट (PM Narendra Modi Tweet) करत सुरेखा यादव यांच्याबद्दल लिहिले आहे की, ही नव्या भारताची सुरूवात आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आज महिला आपलं नावं कमावतं आहेत. यातून या अमृतकाळात देशाची स्वप्न साकार होण्यासाठी या महिलांचा मोठा हातभार राहणार आहे, असं म्हणत नरेंद्र मोदींनी त्यांचे कौतुक केले आहे.