हॉर्न आणि सायरनच्या मोठ्या आवाजापासून सुटका होणार, आता हे संगीत वाजेल; ही आहे नवीन योजना

Nitin Gadkari Announcement : लवकरच देशातील गाड्यांचे हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलू शकतो. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी सोमवारी नाशिकमध्ये (Nasik)  ही माहिती दिली.  

Updated: Oct 5, 2021, 08:22 AM IST
हॉर्न आणि सायरनच्या मोठ्या आवाजापासून सुटका होणार, आता हे संगीत वाजेल; ही आहे नवीन योजना   title=

मुंबई : Nitin Gadkari Announcement : लवकरच देशातील गाड्यांचे हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलू शकतो. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी  (Union Transport Minister Nitin Gadkari) यांनी सोमवारी नाशिकमध्ये (Nasik)  ही माहिती दिली. ते म्हणाले की, असा कायदा आणण्याची त्यांची योजना आहे, ज्या अंतर्गत वाहनांच्या हॉर्नमध्ये फक्त भारतीय वाद्यांचा आवाज वापरता येईल. याशिवाय रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सायरनचाही विचार केला जात आहे. ऑल इंडिया रेडिओवर वाजवल्या जाणाऱ्या ट्यूनमध्ये त्यांचे रूपांतर करण्याचा विचार करत आहेत. (Planning law to use sound of Indian musical instruments only for horns of vehicles: Nitin Gadkari)

गडकरी नाशिकमधील एका महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्याला पोहोचले होते. या दरम्यान ते म्हणाले की, सरकारने व्हीव्हीआयपी संस्कृती आणि लाल दिवा बंद केली आहेत आणि आता त्यांना हे सायरन देखील हद्दपार करायचे आहेत. गडकरी म्हणाले की, आता मी रुग्णवाहिका आणि पोलिसांनी वापरलेल्या सायरनचा अभ्यास करत आहे. एका कलाकाराने ऑल इंडिया रेडिओसाठी एक सूर तयार केला आणि तो पहाटे वाजवला गेला. मी ती धून रुग्णवाहिकेसाठी वापरण्याचा विचार करत आहे जेणेकरून लोकांना ते आवडेल. विशेषत: मंत्र्यांचे पासिंग करताना, सायरन मोठ्या आवाजात वापरला जातो, जो खूप त्रासदायक आहे. तसेच कानांना मोठा धोका पोहोचू शकतात.

हॉर्न आणि सायरनचा आवाज बदलण्यासाठी कायदा करण्यात येईल.
यासाठी लवकरच कायदा करण्याची योजना आखली जात असल्याचे परिवहन मंत्री म्हणाले. या योजनेअंतर्गत भारतीय वाद्यांचा आवाज सर्व वाहनांच्या हॉर्न आणि सायरनमधून येईल. कानांना ते ऐकणे चांगले होईल. नवीन हॉर्नमध्ये बासरी, तबला, व्हायोलिन, हार्मोनियम सारख्या वाद्यांचा आवाज वापरला जाईल. याशिवाय, नवीन महामार्गावर बोलताना केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, एक लाख कोटी रुपये खर्चाचा नवीन मुंबई-दिल्ली महामार्ग आधीच सुरु करण्यात आला आहे, पण तो भिवंडी मार्गे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट-मुंबईच्या परिघापर्यंत पोहोचतो. परिवहन मंत्रालय आधीच वसई खाडीवर महामार्ग बांधत आहे.

गडकरी म्हणाले की, ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना ते वांद्रे-वरळीला वसई-विरारशी जोडू शकले नाहीत. त्यामुळे आता ते समुद्र ओलांडून पूल बांधून ते वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडण्याचा विचार करत आहेत. यामुळे नरिमन पॉईंट ते दिल्ली हे अंतर अवघ्या 12 तासात पूर्ण होईल. या व्यतिरिक्त, यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल.

दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात

गडकरी म्हणाले की, भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात ज्यात 1.5 लाख लोक मारले जातात आणि लाखो जखमी होतात. ते म्हणाले की अपघातांमुळे आपण आपल्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 3 टक्के गमावतो. आता मुंबई-पुणे महामार्गावरील अपघात 50 टक्क्यांनी कमी झाले आहेत. ते म्हणाले की, तमिळनाडूमध्ये रस्ते अपघात आणि मृत्यूंमध्ये 50 टक्के घट झाली आहे, परंतु महाराष्ट्रात असे यश मिळाले नाही. केंद्रीय मंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात अपघातांमुळे होणारे मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे. गडकरी यांनी असेही सांगितले की, त्यांनी वाहनांसाठी सहा एअरबॅग अनिवार्य केल्या आहेत.

नाशिक-मुंबई महामार्ग चौपदरीकरण लवकरच सहा-लेन होईल अंदाजे पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. गडकरी यांनी नाशिकमधील विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. नाशिक जिल्हा प्रभारी मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई-नाशिक महामार्गाचे सहापदरीकरण आणि सारडा सर्कल ते नाशिक रोड या तीन स्तरीय उड्डाणपुलाची मागणी केली होती.