पिंपरीमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार

योगेश शेलार आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास गावातील तुळजाभवानी मंदिरातून देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडत होते.

Updated: Jun 24, 2017, 02:54 PM IST
पिंपरीमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार title=

पिंपरी : पिंपरीमध्ये बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. पिंपळे गुरवमध्ये योगेश शेलार या बांधकाम व्यावसायिकावर २ अज्ञातांनी गोळीबार केला आहे, मात्र गोळीबारामागचं कारण अजून समजू शकलेलं नाही.

योगेश शेलार आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास गावातील तुळजाभवानी मंदिरातून देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडत होते. 

यावेळी स्विफ्ट कारमधून आलेल्या २ अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात शेलार यांच्या पायाला गोळी लागली आहे.

या हल्ल्याचं कारण अद्याप कळू शकलं नाही. पण योगेश रोज एकाच वेळी मंदिरात दर्शनाला जातात. तेव्हा त्यांच्यावर नजर ठेऊनच हा गोळीबार झाली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.