मोठी बातमी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACBची धाड, स्थायी समिती अध्यक्षांना अटक

एसीबीच्या कारवाईने पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे

Updated: Aug 18, 2021, 07:26 PM IST
मोठी बातमी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACBची धाड, स्थायी समिती अध्यक्षांना अटक title=

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) स्थायी समितीच्या बैठकीनंतर स्थायी समितीच्या कार्यालयावर अँटी करप्शन ब्युरोनं (ACB) धाड टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या कारवाईमुळं महापालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. 

स्थायी समितीत कोट्यवधी रुपयांची विकासकामं मंजूर केली जातात. ही कामं मंजूर करताना मोठा गैरव्यवहार होतो अशी चर्चा आहे. एका ठेकेदाराला काम देण्याच्या बदल्यात 9 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, यातील 2 लाख रुपये स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे स्विकारत असताना एसबीने त्यांना रंगेहाथ पकडलं. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष  नितीन लांडगे आणि इतरांची चौकशी करण्यात आली. 

यानंतर स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे (Standing Committee chairman), स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना आता पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे.