कैलास पुरी, पिंपरी-चिंचवड : कायम वादग्रस्त विधानांसाठी चर्चेत येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर नितीन काळजे एका नव्या वादात अडकले आहेत. पण हा वाद त्यांना कदाचित महापौर पदावरून पायउतार करणारा ठरू शकतो.
मोठा राजकीय दबाव आणत आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या गटाच्या नितीन काळजे यांना पिंपरीच्या महापौरपदावर बसवले. पण आता ते खोट्या जात प्रमाणपत्राच्या वादात अडकलेत. काळजे यांनी सादर केलेले कुणबी जातीचं प्रमाणपत्र खोटं असल्याची तक्रार घनश्याम खेडेकर यांनी दाखल केली आहे.
दुसरीकडे महापौरांनी याबाबत जात पडताळणी समिती निर्णय घेईल असा दावा केला आहे. जात पडताळणी समितीच्या आगामी सुनावणी दरम्यान आता महापौरांचं भवितव्य ठरणार आहे. पण एकूणच महापौरांसाठी हा नवा वाद डोकेदुखी ठरण्याची चिन्हं आहेत.