800 शाळाबाह्य मुले शाळेत, चेतन परदेशी यांचा सयुंक्त राष्ट्राकडून गौरव

'एस फॉर स्कूल' ही सामाजिक संस्था. या एनजीओच्या माध्यमातून त्याने गेल्या काही वर्षात 1600 शाळा बाह्य मुलांना शाळेत आण्यासाठी प्रयत्न केले.  

Updated: Jan 1, 2021, 02:41 PM IST
800 शाळाबाह्य मुले शाळेत, चेतन परदेशी यांचा सयुंक्त राष्ट्राकडून गौरव  title=

कैलास पुरी / पिंपरी-चिंचवड : त्याचे शिक्षण अभियांत्रिकी शाखेतून झालेले. पण सामाजिक कामाची त्याला आवड होती. याच आवडीतून त्याने 'एस फॉर स्कूल' ही सामाजिक संस्था सुरु केली. त्या एनजीओच्या माध्यमातून त्याने गेल्या काही वर्षात 1600 शाळा बाह्य मुलांना शाळेत आण्यासाठी प्रयत्न केले. त्यातली 800 मुले शाळेत परत आली.(Pimpri-Chinchwad. 800 out-of-school children in the mainstream of education) त्याच्या या कामाची सयुंक्त राष्ट्राने दखल घेतली. सयुंक्त राष्ट्राने त्यांना पुरस्काराने सन्मानित केले.

पिंपरी चिंचवडच्या कृष्णानगर भागात राहणारे चेतन परदेशी. आदिवासी भाग, दुर्गम भाग किंवा ग्रामीण भागात अनेक मुले मधूनच शाळा सोडतात. अशा मुलांना पुन्हा शाळेत आणण्यासाठी चेतन त्यांच्या सहकाऱ्यांसह त्याच्या 'एस फॉर स्कूल' या एनजीओच्या माध्यमातून प्रयत्न केले. राज्यातल्या १३ जिल्ह्यात त्यांचे हे काम सुरु आहे. त्यांच्या या प्रयत्नातून त्याने जवळपास १६०० शाळा बाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या कामाची दाखल घेतली गेली. त्यांना सयुंक्त राष्ट्र स्वयंसेवक पुरस्कार देण्यात आला. नुकतीच युवा आणि खेळ राज्यमंत्री किरेन रिज्जू यांनी ही घोषणा केली..

साहजिकच हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाल्याचे चेतन सांगतात. यापुढेही काम जोमाने करणार असल्याचे ते सांगतात. शाळाबाहय मुलांना परत आणणे एवढेच नाही तर ग्रामीण भागात फिरती ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक उपलब्ध करून देणे अशी कामे ही चेतन एनजीओच्या माध्यमातून करत आहेत. एवढेच नाही तर आरोग्य जागरूकता कामात चेतन यांचे 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' ही झलेले आहे. अशा सामाजिक कार्यात रमलेल्या चेतन यांचे कौतुक होत आहे.