वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय भेजा जेल...! भुजबळांचा निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Updated: Feb 2, 2019, 10:35 PM IST
वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय भेजा जेल...! भुजबळांचा निशाणा title=

पिंपरी-चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. वारे शासन तेरा खेल, मांगा न्याय भेजा जेल...!, असा निशाणा छगन भुजबळ यांनी साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या सभेचं पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या परिवर्तन यात्रेला छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि अजित पवार उपस्थित होते. या परिवर्तन यात्रेतल्या भाषणात बोलताना छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवरही टीका केली. यावेळी भुजबळ यांनी मोदींचीही नक्कल केली.

या सरकारचा आवाज जास्त आहे, पण काम काहीच नाही. बनेगा पकोडे, बनेगी चाय, स्कूल-कॉलेज जाये भाड मे, आम आदमी के साथ मन की बात, अदानी-अंबानीके साथ धन की बात, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. मोदी हे महाराष्ट्र सदनाची स्तुती करतात, पण महाराष्ट्र सदन अच्छा है, मगर बनानेवाला जेल मे है, असं म्हणत छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. 

आता 'पार्थ'ला उठ म्हणा! धनंजय मुंडेंचा अजितदादांना आग्रह