पिंपरी चिंचवड : दोन्ही किडन्या व्यवस्थित असताना देखील डॉक्टरांनी एका तरुणावर डायलिसिसची प्रक्रिया केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हा प्रकार घडल्याचा आरोप रुगणाच्या नातेवाईकांनी केला आहे. पिंपरी शहरातील वेताळनगरमध्ये राहणाऱ्या आनंद अनिवाल याला उपचारासाठी त्याला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या बेफिकीपणामुळे आनंदवर हा प्रसंग ओढवला आहे.
आनंदच्या टीक्त रक्तातील क्रिटेनिनच प्रमाण 24 असल्याचा रिपोर्ट आल्याने डॉक्टरांनी दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी आनंदला डायलिसिसवर ठेवले. दुसरा रिपोर्ट मात्र सामान्य आला. आनंदच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात ही तपासण्या केल्या आणि तो रिपोर्ट ही नॉर्मल आला.
दरम्यान रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे ह्यांना विचारलं असता त्यांनी असा प्रकार घडल्याचे मान्य केले आहे. तसेच या प्रकणाची सखोल चौकशी करून माध्यमांसमोर खुलासा करणार असल्याच सांगितले आहे.