शरद पवार 'जातीयवादी', त्यांच्यावर पीएचडी; भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा 'नवा अभ्यास'

कुणी त्यांना राजकारणातले भीष्म पितामह म्हणतात, तर कुणी राजकीय चाणक्य.. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आता phd करण्यात येतेय.  

Updated: Apr 3, 2022, 08:41 PM IST
शरद पवार 'जातीयवादी', त्यांच्यावर पीएचडी; भाजप प्रदेशाध्यक्ष यांचा 'नवा अभ्यास' title=

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपने खूप मोठी आघाडी घेतली आहे. अनेक नेत्यांच्या सभा होत आहेत. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढवीत आहे. पण, आघाडीचे नेते मात्र वैयक्तिक टीका करत आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काही कॉलेजचे विद्यार्थी घराघरात जावून मतदारांची माहिती घेत आहेत. पे टीएमने पैसे ट्रान्स्फर करण्याच्या प्रयत्न सुरू आहे. या प्रकाराबद्दल आम्ही ed कडे तक्रार करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी 1 हजार रुपयांसाठी ससेमिरा मागे लावून घेवू नये, असे ते म्हणाले.

 

काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या कल्चरमध्ये जाती जातीमध्ये भांडण लावणे हे कधी दिसलं नाही. पण, शरद पवार यांच्या प्रत्येक ऍक्शनमध्ये "जातीयवाद" आहे. तसेच, युपीए हे बुडते जहाज आहे. त्या बुडत्या जहाजाचे कॅप्टनशीप शरद पवार का घेतील, असा प्रश्न त्यांनी केला. 

शरद पवार म्हणतात की मनसे ही भाजपची बी टीम आहे. पण, याच पवारांनी राज ठाकरे यांना घेवून बी टीम तयार करून लाव रे तो व्हिडीओ केलं. आम्ही तसं काही करत नाही. शरद पवार यांच्यावर मी Phd करतोय. इतक्या जास्त वयात ते कसं काम करतात. ते कसे संपर्कात असतात याची माहिती घेतोय, असं त्यांनी सांगितलं.