एक लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील? पाहा महाराष्ट्रातील आजचे नवे दर

Petrol Diesel Price Today : गेल्या आठवड्याभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्ही जर गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचे दर... 

श्वेता चव्हाण | Updated: Mar 18, 2024, 12:08 PM IST
एक लीटर पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील? पाहा महाराष्ट्रातील आजचे नवे दर title=

Petrol Diesel Price Today in Maharashtra: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी तुम्ही गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करत असाल तर पेट्रोल डिझेलचे आजचे नवीन दर नक्कीच तपासा. दरम्यान केंद्र सरकारने 14 मार्चला इंधनाच्या दरात कपात करण्याच घोषणा केली. त्यानंतर मात्र पेट्रोल डिडेल स्वस्त झाले आहे. निवडणुकापूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला असून पेट्रोल-डिझेल 2 रुपयांनी स्वस्त झाले आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र कच्चा तेलाच्या किमतीत दरवाढ सुरुच आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली असून ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $85.60  आहे. तर WTI क्रूड प्रति बॅरल $81.32 वर आहे. महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे नवे दर जाहिर केले जातात.  जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. जाणून घ्या  महाराष्ट्रासह राज्यातील पेट्रोल डिझेलचे नवे दर... 

महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर 

महाराष्ट्रात आज पेट्रोल 104.21 रुपये प्रतिलीटर आहे तर डिझेल  92.15 रुपये आहे.  मुंबईत पेट्रोल 104.21 रुपयांनी प्रतिलीटरने विकले जाणार आहे. तर डिझेल 92.15 रुपयांनी विकले जाईल. ठाण्यात पेट्रोल 104.33 रुपये तर डिझेल 90.88 रुपये, पुण्यात पेट्रोल 103.93 तर डिझेल 90.46 रुपये, नागपूरमध्ये पेट्रोल 104.31 रुपये तर डिझेल 90.86 रुपयांनी विकले जाईल. तसेच नाशिकमध्ये 103.80 रुपये  तर डिझेल 90.34 रुपयांनी विकले जाणार आहे. 

22 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल करण्यात आलेला नव्हता.  हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सारख्या कंपन्या त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. तसेच देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. त्यानुसार तुम्ही घरबसल्या पेट्रोल डिझेलचे नवे दर तपासू शकता. यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या वेबसाइटवर जावे लागेल किंवा एसएमएस पाठवावा लागेल. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर तुम्ही RSP सोबत 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता आणि तुम्ही BPCL ग्राहक असाल तर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवू शकता.