Petrol Rate Today : महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजच्या ताज्या किंमती

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत भारतीय सामान्य नागरिकांना अद्याप दिलासा मिळाला नाही. एक लिटर पेट्रोल आणि डिझेलसाठी राज्यातील वाहनधारकांना इतके रुपये मोजावे लागणार आहेत.  

श्वेता चव्हाण | Updated: Jun 1, 2023, 09:02 AM IST
Petrol Rate Today : महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल, पाहा आजच्या ताज्या किंमती title=
petrol diesel price on 1 June 2023

Petrol Diesel Rate on 1 June 2023 : जागतिक बाजारात कच्चा तेलाने आज मोठा दिला असून प्रति बॅरल 70 डॉलरच्या जवळ पोहोचले आहे. क्रूडचे दर 130 वरून 72 वर आले असले तरी आजही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या वर विकले जात आहे. यामध्ये तेलंगणा, पंजाब, झारखंड, सिक्कीम, ओडिशा, केरळ, तामिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या पुढे विकले जात आहे. परिणामी भारतीय सर्वसामान्य ग्राहकांना अजूनही किंमतीविषयी दिलासा मिळाला नाही. आजही महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पेट्रोल महाग विकले जात आहे तर काही जिल्ह्यात स्वस्त मिळत आहे. जाणून घ्या आजचे दर....

शहर  पेट्रोल (रु.)  डिझेल (रु.)
अहमदनगर  106.36 93.88
अकोला  106.14 92.69
अमरावती  106.57 93.11
औरंगाबाद  107.40 93.87
भंडारा  107.11 93.62
बीड  107.97 93.44
बुलढाणा  106.65 93.18 
चंद्रपूर  106.42 92.97
धुळे  105.94 92.48
गडचिरोली  107.03 93.55
गोंदिया  107.85 94.33
बृहन्मुंबई  106.31 94.27
हिंगोली  107.43 93.93
जळगाव  106.43 92.95
जालना  107.84 94.29
कोल्हापूर  106.51 93.05
लातूर  107.45 93.69
मुंबई शहर  106.31 94.27
नागपूर  106.63 93.16
नांदेड  108.37 94.85
नंदुरबार  107.99 93.49
नाशिक  106.56 93.07
उस्मानाबाद  107.35 93.84
पालघर  106.25 92.55
परभणी  108.79 95.21
पुणे  106.79 92.30
रायगड  107.48 92.30
रत्नागिरी  107.48 93.87
सांगली  106.83 92.95
सातारा  107.09 93.22
सिंधुदुर्ग  107.83 94.72
सोलापूर  106.60 93.12
ठाणे  105.74 92.24
वर्धा  106.23 93.77
वाशिम  106.91 93.43
यवतमाळ  106.49 93.04

आज (1 June 2023) महाराष्ट्रात पेट्रोलची विक्री सरासरी 106.93 रुपयांनी होत आहे. तर डिझेल 93.52 रुपयांनी विकले जाणार आहे. इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीतील सर्व चढ-उतारानंतर 21 मे 2022 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजही सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. येथे पेट्रोल ₹84.10 आणि डिझेल ₹79.74 प्रति लिटर आहे. तर देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल राजस्थानमध्ये आहे. श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलची किंमत ₹113.48 आहे, तर डिझेलची किंमत ₹98.24 आहे. ब्लूमबर्ग एनर्जीनुसार, ब्रेंट क्रूडची जुलैची फ्युचर्स किंमत प्रति बॅरल $72.66 आहे. WTI चे जुलै फ्युचर्स आता प्रति बॅरल $66.27 वर आहे.