महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी

जागावाटपावरुन वंचितची महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिस्कटली. वंचितने आघाडीवर घाव घालत नवी खेळी केली आहे. वंचितने थेट जरांगेंसोबत हातमिळवणी केली आहे. 

Updated: Mar 27, 2024, 09:28 PM IST
 महाविकास आघाडीसोबत काडीमोड; प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची जरांगेंसोबत नवी आघाडी title=

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तेव्हा वंचित आता महाविकास आघाडीसोबत नसणार हे स्पष्ट झाल आहे.  मविआला मात्र यामुळे मोठा धक्का बसला प्रकाश आंबेडकरांनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतलाय.  वंचित बहुजन आघाडीच्या 8 उमेदवारांची पहिली यादी आंबेडकरांनी जाहीर केली आहे. तर, अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. वंचितने जरांगेंसोबत नवी आघाडी केली आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी केली  तिस-या आघाडीची घोषणा

प्रकाश आंबेडकरांनी मविआशी फारकत घेत तिस-या आघाडीची घोषणा केलीय.. वंचित बहुजन आघाडीच्या 8 उमेदवारांची यादी आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर अकोल्यातून स्वत: लढण्याची घोषणा केलीय.. प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षानं सांगलीतून उमेदवार उभा केल्यास त्यांना पाठिंबा देण्याची घोषणाही आंबेडकरांनी केलीय..पत्रकार परिषद घेत तिस-या आघाडीचे स्पष्ट संकेत दिलेत. त्याचवेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी पक्षाच्या आघाडीची घोषणा करत 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. आंबेडकरांनी नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय तर मनोज जरांगेंशी आघाडीबाबत चर्चा झाली असून 30 तारखेला जरांगे आपला निर्णय जाहीर करणार आहेत, असंही आंबेडकरांनी सांगितलंय.

सांगलीमधून प्रकाश शेंडगेंच्या ओबीसी बहुजन पक्षाने उमेदवार उभा केल्यास त्यांना पाठिंबा देणार असल्याची घोषणाही आंबेडकरांनी केलीय. तसंच नागपूरमधून काँग्रेसला बिनशर्त पाठिंबाही जाहीर केलाय. महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेताना आंबेडकरांनी जरांगेंसोबत नवी आघाडी केलीय.. प्रकाश आंबेडकरांनी अंतरवाली-सराटीत जाऊन जरांगेंची भेट घेतली. वंचितच्या घडामोडींना त्यानंतर वेग आला.  एकीकडे वंचितने मविआसोबत फारकत घेतली असली तरीही वंचितने मविआसोबत यावं अशी आग्रही भूमिका मविआच्या नेत्यांनी घेतलीय.

मनोज जरांगे पाटील वंचितसोबत

 2019 मध्ये  वंचित स्वतंत्र लढल्यामुळे लोकसभेला 7 ते 8 आणि विधानसभेला 10 ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला थेट फटका बसला होता. वंचितसोबत यंदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहेत. जरांगे 30 मार्चपर्यंत भूमिका घेणार आहेत. वंचितचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते. त्यामुळे आम्ही आता वेगळा निर्णय घेत आहोत. या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका होणार आहे, हे मला माहीत आहे. मात्र मी लोकांची नस ओळखतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.  वंचितचे उमेदवार मुस्लिम, जैन, ओबीसी, गरीब वर्गातले असतील. त्यासोबतच मराठा आंदोलक मनोज  जरांगेंसोबतही वंचितने नवी आघाडी केलीय.. तेव्हा प्रकाश आंबेडकरांचा हा नवा पॅटर्न किती यशस्वी होतोय... की मविआला याचा फटका बसून भाजपप्रणित महायुतीला याचा फायदा होतोय? हे येणा-या लोकसभा निवडणुकीतच कळणार आहे.