नवी मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू

  building collapses in Navi Mumbai : नवी मुंबईमधील बोनकोडे गावातील चार मजली इमारतीचा एक भाग कोसळला.  

Updated: Oct 2, 2022, 08:17 AM IST
नवी मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू
संग्रहित छाया

नवी मुंबई : Part of building collapses in Navi Mumbai : नवी मुंबईमधील बोनकोडे गावातील चार मजली इमारतीचा एक भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगा-याखाली अडकून एकाचा मृत्यू झाला आहे. सकाळपासून ही इमारतीचा काही भाग झुकल्याने येथे राहणाऱ्या काही कुटुंबाने ही इमारत खाली करण्यास सुरुवात केली होती. याचवेळी रात्री दहाच्या सुमारास या इमारतीचा एक भाग कोसळला.

अपघातानंतर तात्काळ अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येऊन सर्च ऑपरेशन सुरु केले. यादरम्यान एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. 2007 साली या इमारतीचे  बांधकाम करण्यात आले होते. या इमारतीमध्ये 34 कुटुंब  राहात होती. सर्व रहिवाशांना महापालिकेच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आली आहेत. या घटनेमुळे नवी मुंबईतल्या गावठाण भागातील निकृष्ट बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 

दरम्यान, जून महिन्यातही अशीच एक दुर्घटना घडली होती. इमारतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. वृत्तानुसार, नवी मुंबईतील नेरुळ हाऊसिंग सोसायटीमध्ये सहाव्या मजल्यावरील फ्लॅटचा सिलिंग स्लॅब कोसळला. नेरुळ येथील सेक्टर 17मधील जिमी पार्क सोसायटीत ही घटना घडली होती