श्रीकांत राऊत / आर्णी, यवतमाळ : Paper tea news : आता बातमी जादूच्या चहाची... अनेकांचं चहाशिवाय पान हलत नाही... सकाळ, दुपार, संध्याकाळी चहा हवाच... पण तोच चहा चक्क कागदामध्ये उकळलेला असेल तर ? कुठे मिळतो हा अनोखा चहा, चला बघुयात. (Paper tea, Drink and be refreshed)
भांड्यात नव्हे, कागदात चहा बनवला जातो. या चहाला 'मॅजिक टी' असे म्हटले जात आहे. हा चहा प्या आणि ताजेतवाने व्हा. तुम्हाला हवाय कागदातला चहा? तुम्हा व्हिडिओतील दृष्य नीट बघा. या चहाला मस्त उकळी येत आहे. पण हा चहा उकळतोय तो चक्क कागदावर. ऐकून धक्का बसला ना ? असंच आश्चर्य वाटतं ते यवतमाळच्या अब्बास भाटी या तरुणाच्या टी स्टॉलवर आलेल्या प्रत्येकाला.
चुलीवरचा चहा किंवा तंदूर चहा अनेकांनी प्यायला असेल. पण अब्बासच्या या 'मॅजिक टी'ची सध्या यवतमाळ जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे. आर्णी तालुक्यातील कवठा बाजार या गावात अब्बासचा हा अनोखा टी स्टॉल आहे. अब्बास चार काड्या घेऊन त्यामध्ये कागद लावतो आणि गंज तयार करतो. चार विटांची चूल तयार केली जाते. या चुलीवर कागदाचा गंज ठेवून त्यात पाणी, दूध, साखर, चहा पत्ती, इलायची टाकली जाते. चुलीवर मस्त वाफाळलेला चहा तयार होतो तो कागदावर.
अब्बासचा हा चहा प्यायला पंचक्रोशीतून लोक आवर्जून येतात. तुम्हालाही या अनोख्या चहाची चव चाखायची असेल तर अब्बासच्या स्टॉलला भेट दिलीच पाहिजे.