वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला डाळिंबाचा महानैवेद्य

वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला खास सजावट

Updated: Jun 16, 2019, 09:01 PM IST
वटपौर्णिमेनिमित्त विठुरायाला डाळिंबाचा महानैवेद्य title=

पंढरपूर : आजच्या वटपौर्णिमेनिमित्त निमित्ताने पंढरपुरातील विठुरायाला खास सजावट करण्यात आली. पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात डाळींबांनी सजावट केली आहे. पुण्यातील एका भाविकाने विठ्ठल-रुक्मिणीला डाळिंबाचा महानैवेद्य दाखवला आहे. आज टपौर्णिमेनिमित्त विठूरायाचे मंदिर डाळिंबांच्या फळांनी सजवले आहे.  

तसेच रुक्मिणी देवीचा गाभारा, चौखांबी सुद्धा डाळिंबाने भरून गेली आहे. पुण्यातील भाविक राजाभाऊ भुजबळ आणि राहुल ताम्हाणे या दोन भाविकांनी पाच हजार डाळींबाची सजावट केली आहे. 

आज महाराष्ट्रभर महिलांनी वटपोर्णिमा सण उत्साहात साजरा केला. महाराष्ट्रात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच वटपौर्णिमेच्या सणाचे औचित्य साधून विठ्ठल-रुक्मिणीचा गाभारा सुंदररित्या सजवण्यात आला.