भाविकांवर काळाचा घाला, 4 वारकऱ्यांचा मृत्यू; 17 जण जखमी

एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांवर काळाचा घाला

Updated: Mar 14, 2022, 09:58 AM IST
भाविकांवर काळाचा घाला, 4 वारकऱ्यांचा मृत्यू; 17 जण जखमी title=

पंढरपूर : राज्यात आज दोन भीषण अपघात झाले आहेत. भाविकांना काळाने रस्त्यात गाठलं आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. तर दुसरीकडे देऊळगाव राजाजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला.

एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणा-या वारक-यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 वारक-यांचा मृत्यू झाला. तर 17 जण जखमी झाले. त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. 

वारकरी पंढरपूरला जात असताना सोलापुरातल्या कोंडी इथं ही भीषण दुर्घटना घडली. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मालट्रकचं टार फुटलं आणि ते वारक-यांच्या गाडीवर आदळलं. अपघातातील सर्व वारकरी तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी गावचे रहिवासी आहेत. 

बुलडाण्यात भीषण अपघात

बुलडाण्यात भाविकांचा भीषण अपघात झाला आहे. शेगावला जाणा-या भाविकांच्या बोलेरो गाडीचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. देऊळगाव राजाजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास बोलेरो गाडीला भीषण अपघात झाला. खामगाव जालना महामार्गावर बोलेरो आणि ट्रकच्या धडकेत ५ जण जागीच ठार झाले.

मृतकांमध्ये बोलेरो चालक, एक महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. बोलेरोतील सर्वजण जालन्याहून शेगावला गजानन महाराज दर्शनासाठी निघाले होते. चार जखमींवर देऊळगाव राजा आणि जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडे पाचच्या सुमारास झाला अपघात.