मुंबईजवळच्या 'या' खाडीत मासेमारीसाठी उतरलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; तो हळूच आला आणि...

Palghar News : बापरे! मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर शार्क हल्ला; खाडीमध्ये कुठून आला हा महाकाय जीव? घटनास्थळी काय घडलं माहितीये...   

सायली पाटील | Updated: Feb 14, 2024, 10:41 AM IST
मुंबईजवळच्या 'या' खाडीत मासेमारीसाठी उतरलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; तो हळूच आला आणि...  title=
palghar news shark attack on young fisherman in vaitarna creek

Palghar News : मुंबई आणि नजीकच्या (Mumbai Creek) परिसरामध्ये समुद्र आणि खाडीचा मोठा भाग पाहायला मिळतो. या शहरातील बहुतांश कोळी वर्ग याच समुद्रात आणि खाडीमध्ये मासेमारी करत मत्स्यविक्री व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. कैक वर्षांपासून सुरु असणाऱ्या या व्यवसायामुळं मासेमारांना आणि किनाऱ्यालगतच्या नारिकांना या भागाची बरीच माहिती असते. पण, आता मात्र मासेमारी करणाऱ्यांनाही काही सागरी जीवांचा धोका उदभवताना दिसत आहे. 

मुंबईपासून (Mumbai News) काही अंतरावर असणाऱ्या पालघर जिल्ह्यातील वैतरणा खाडीमध्ये मंगळवारी घडलेल्या एका घटनेमुळं सध्या या परिसरासह मुंबई शहरातील खाडी परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. वैतरणा खाडीमध्ये मासेमारीसाठी म्हणून उतरलेल्या तरुणावर एकाएकी शार्कनं हल्ला केला आणि या महाकाय सागरी जीवानं चावा घेतल्यानंतर तो तरुण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती यंत्रणांनी दिली. 

विकी गोवारी (वय 32) असं या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून, त्याला तातडीनं मनोरमधील आस्था रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं. नंतर त्याला पुढील उपचारांसाठी विनोबा भावे रुग्णालयात पाठवण्यात आलं. 

हेसुद्धा वाचा : Farmers Protest : 'आम्हाला वाट द्या अन्यथा....'; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं 

घटनासमयी नेमकं काय घडलं? 

प्रत्यक्षदर्शी आणि काही सूत्रांच्या माहितीनुसार मंगळवारी काही तरुण मनोरमधील वैतरणा खाडीमध्ये मासेमारीसाठी आले होते. मासेमारी करत असतानाच खाडीच्या पाण्यातून अचानकच शार्कनं विकीवर हल्ला केला आणि यामध्ये त्याला गंभीर इजा झाली. शार्कनं विकीच्या पायाचा लचकाच तोडला, ज्यानंतर अतीरक्तस्त्रावामुळं विकी बेशुद्ध झाला होता. 

मासेमार तरुणावर हल्ला करणारा शार्क मासा 200 किलो वजनाचा होता असं सांगण्यात येत आहे. नागरिकांच्या माहितीनुसार मंगळवारपासूनच समुद्राला उधाण येत असल्यामुळं या उधाणाच्या पाण्यासोबतच खाडीमध्ये समुद्रावाचे हा महाकाय मासा आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. उधाण ओसरल्यानंतर ज्यावेळी इथं पाणी कमी झालं तेव्हा हा शार्क इथंच मृत अवस्थेत आढळला.