पुण्यामध्ये पीएफआयविरोधात मनसे आक्रमक झाली असून, पाकिस्तान झिंदाबादचे नारे देणा-यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय...पीएफआय़वर कारवाई केल्यानंतर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला...त्यानंतर आता मनसे आक्रमक झाली असून,
पुण्यातील अलका टॉकिज चौकात मनसेनं हे आंदोलन केलं.. (Pakistan Murdabad MNS angry on yesterday PFI protest in Pune )या आंदोलनादरम्याम पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.. तसंच PFIवरबंदी आणावी आणि घोषणाबाजी करणा-यांवर
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही करण्यात आली.
पीएफआयविरोधी देशव्यापी कारवाईविरोधात पुण्यात पीएफआय समर्थकांनी आंदोलन केलं.. .या आंदोलनादरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हीडिओ व्हायरल होतोय.
या घोषणांची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेण्यात आलीय..शिवरायांच्या भूमीत असलं खपवून घेणार नाही..असं शिंदे यांनी म्हटलंय..तसेच गृहविभाग गांभीर्यानं चौकशी करत असून देशद्रोही कृतीचा बंदोबस्त केला जाईल...असंही शिंदेंनी म्हटलंय..
त्याचसोबतमनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा याविरोधात कठोर शब्दात ट्विट केलं होतं . (raj thackeray tweet)
पुण्यामध्ये आज मनसे हर हर महादेव चा नारा देणार आहे. पी एफ आय च्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा दिल्या गेल्या. त्यावरून पुणे हे मुस्लिम (muslim)मुलतत्ववाद्यांचं प्रमुख केंद्र बनत आहे. दहशतवादी (terrorism activities)कारवायांना पुण्यामध्ये पाठिंबा मिळत
आहे. असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुण्यामध्ये आंदोलन होणार आहे
माझी केंद्रातील, राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे'' असं राज ठाकरे म्हणालेत.