पद्मावत वाद: गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेनेचे आंदोलन

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापुर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेना, महाराणा प्रताप सेनेने हल्लबोल केलाय. भन्साळी आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी प्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

Updated: Jan 24, 2018, 06:51 PM IST
पद्मावत वाद: गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेनेचे आंदोलन title=

नाशिक: नाशिक जिल्ह्यातल्या गंगापुर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेना, महाराणा प्रताप सेनेने हल्लबोल केलाय. भन्साळी आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी प्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

आक्रमक झालेल्या करणी सेनेच्या कार्यकर्त्या्ंनी जलसमाधीचा इशारा दिल्यान मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांपेक्षा पोलीस आणि पत्रकारांची संख्या अधिक असुन, पोलीस काही वेळात कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.