धक्कादायक, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँकचा स्फोट, रुग्णांची पळापळ

सोलापुरातील एका रुग्णालयामध्ये (Markandey Cooperative Hospital) ऑक्सिजन टँकचा स्फोट झाल्याने एकच गोंधळ झाला.  

Updated: Mar 25, 2021, 11:09 AM IST
धक्कादायक, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टँकचा स्फोट, रुग्णांची पळापळ title=

सोलापूर : येथील मार्कंडेय सहकारी रुग्णालयामध्ये (Markandey Cooperative Hospital) ऑक्सिजन टँकचा स्फोट झाल्याने एकच गोंधळ झाला. रात्री उशिरा हा स्फोट झाला. केमिकल रिअॅक्शनमुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (Oxygen tank explodes at Markandey Cooperative Hospital in Solapur)

सुदैवाने नवीन टाकीद्वारे ऑक्सिजन सप्लाय सुरू होता. त्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र,  रात्री उशिरा हा स्फोट झाल्याने अनेक जण झोपेत होते. त्यामुळे अधिक गोंधळात भर पडली. स्फोटमुळे टाकीतील केमिकल पावडर बाहेर पडल्याने एकच घबराट झाली. स्फोटानंतर रुग्णांच्या नातेवाईकमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.