मुंबई / ठाणे : गुडविन ज्वेलर्सच्या मालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत त्यांच्याविरोधात ५४ ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यांनी ग्राहकांनी गुंतवलेले कोट्यवधी रुपये घेऊन पळ काढल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, हे मालक केरळचे असून ते परिवारासह फरार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे. तसेच ते परदेशात पळून जाऊ नये, म्हणून त्यांच्याविरोधात लूकआउट नोटीस बजावण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
गुडविन ज्वेलर्सच्या मालकांची मालमत्ता जप्त करण्यात सुरुवात पोलिसानी केली आहे. या ज्वेलर्सचे मालक देश सोडून फरार होऊ नये म्हणून लवकरच लूकआउट नोटीस काढण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आतापर्यंत ५४ ग्राहकांच्या त्यांच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. हा आकडा ३००च्या पुढे जाईल. तसेच आतपर्यंत ती कोटी रुपयांचा घोटाळा वाटत होता. परंतु हा आकडा ही २० ते २५ कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
Mumbai: Owners of Goodwin jewellers have been booked for allegedly fleeing with crores of rupees invested by customers. Police say,"The owners belong to Kerala and are absconding along with family. The offence has been registered & search for the accused is on". pic.twitter.com/v2pMqdeOGJ
— ANI (@ANI) October 28, 2019
१ ऑक्टोबरला केरळ येथे गुडविन मालक सुनील आणि सुदेश यांनी एक रिसॉर्ट उघडले आहे. त्यासाठी मोठी पार्टी ठेवली होती. त्यात अनेक केरळचे नेते मंडळी गेली होती, अशी ही हाती आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहिरे यांनी ही माहिती दिली.
पीएमसी बँकमध्ये १२ लाख अडकले तर आता गुडविन ज्वेलर्समध्ये साडेतीन लाख रुपये अडकले आहेत. हे दोन्ही झटके बसलेत ठाकुर्ली येथे राहणाऱ्या आदमाने परिवाराला. भविष्य निर्वाह निधीचे अर्थात पीएफचे मिळालेले पैसे देवदास आदमाने यांनी गुडविन ज्वेलर्समध्ये गुंतववले होते. तर मुलाने व्हिआरएसचे पैसेही यात गुंतवले होते. यामागचा उद्देश म्हणजे तीन मुलांच्या शिक्षणसाठी हातभार लागावा, असा होता. तर आई वडिलांच्या औषधपाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून ही गुंतवणूक त्यांनी केली होती, अशी माहिती पुढे आली आहे. परंतु आता हे कष्टचे पैसे परत मिळणार की नाही, या विचाराने आदमाने परिवाराच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.
A case was registered against the owners of a jewellery store chain for allegedly fleeing with crores of rupees invested by customers
Read @ANI Story | https://t.co/ofxP5xtcS7 pic.twitter.com/qPHDQ0wtEC
— ANI Digital (@ani_digital) October 28, 2019
आजही डोंबवलीतील रामनगर पोलीस स्टेशनला गुडविन गुंतवणुकदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आली. जशी जशी माहिती समोर येत होती तसतशी गर्दी वाढत आहे. आतपर्यंत ५४ जणांनी तक्रारी दिल्या असून एकूण ५४ गुन्हे नोंदविण्यात आले आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर आम्ही आमचे सगळे पैसे गुंतविले आहेत. पोलिसांनी आम्हाला आम्हचे पैसे परत मिळवून द्यावे, अशी विनंती गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी केली आहे.
#Maharashtra:Case registered against Goodwin Jewellers after people protesting outside its Thane showroom alleged that the company's chairman&MD shut down its all branches&had gone missing.Police says,"250-300 people approached us, we've sealed Goodwin Jewellers showroom" (28.10) pic.twitter.com/QYxCOkLwkY
— ANI (@ANI) October 28, 2019