Abdul Sattar: 150 कोटींचा मोठा घोटाळा; अब्दुल सत्तार यांच्यावर अजित पवारांनी नेमका काय आरोप केलाय?

याप्रकरणी अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील अजित पवार यांनी  केली आहे. तर,  निर्दोष सिद्ध होईपर्यंत राजीनामा घ्यावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनीही केली आहे. अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन

Updated: Dec 26, 2022, 06:50 PM IST
Abdul Sattar: 150 कोटींचा मोठा घोटाळा; अब्दुल सत्तार यांच्यावर अजित पवारांनी नेमका काय आरोप केलाय?  title=

Abdul Sattar:  हिवाळी अधिवेशनात(Maharashtra Winter Session 2022 ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर घोटाळ्याचा गंभीर आरोप झाला. यानंतर आता  विरोधी पक्षनेते अजित पवार(Opposition leader Ajit Pawar ) यांनी मंत्री अब्दुल सत्तार(Minister Abdul Sattar) यांच्यावर गंभीर आरोप केल आहेत. तत्कालीन महसूल राज्यमंत्री असताना सत्तार यांनी वाशीममधील 37 एकर गायरान जमिनीचं वाटप करण्याचा निर्णय घेतला. या जमीन वाटपात 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अजित पवारांनी केला आहे. 

याप्रकरणी अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील अजित पवार यांनी  केली आहे. तर,  निर्दोष सिद्ध होईपर्यंत राजीनामा घ्यावा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनीही केली आहे. अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन

मंत्री अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधिमंडळाच्या पाय-यांवर आंदोलन केलं. 'राजीनामा दो, गद्दार सत्तार राजीनामा दो' अशा घोषणा देत विरोधक सत्तारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. 
याच ठिकाणी काहीवेळासाठी उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारही आले होते. 

सत्तारांनी घोटाळ केल्याचा आरोप झालेल्या जमिनीची किंमत 150 कोटी रुपये आहे.  मंत्र्यांनीच पदाचा दुरुपयोग केला आहे. एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यासाठी पदाचा गैरावापर केला गेला. सुप्रीम कोर्टाचा निर्णय समोर असताना त्यांनी हे सर्व केले आहे. त्यांनी जबाबदारी स्विकारुन आपल्या पदाचा राजिनामा दिला पाहिजे, राजिनामा दिला नाहीतर त्यांची मुख्यमंत्र्यांनी हक्कालपट्टी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.  

या पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर झालाय घोटाळ्याचा आरोप

नागपूर न्यासाची 83 कोटींची जमीन 2 कोटींना मुख्यमंत्र्यांनी विकल्याच्या आरोपांवरून विधानपरिषदेचं चांगलाच गदारोळ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटींचा विकल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत केला. न्यायालयाने या प्रकरणात ताशेरे ओढल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली. तर विरोधी पक्षनेते आणि खडसे सभागृहाची दिशाभूल करत आहेत असा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला.  न्यासावरून विरोधकांनी राळ उठवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रत्युत्तर दिलं. आम्ही बिल्डरला 330 कोटी फुकट देत नाहीत असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. आपण कोणताही गैरप्रकार केला नाही. केवळ अर्धवट माहितीच्या आधारे बिनबुडाचे आरोप करण्यात येतायेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.