Gov Job | राज्य सरकारी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; MPSC तर्फे 290 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची (2021) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Updated: Oct 5, 2021, 05:12 PM IST
Gov Job | राज्य सरकारी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; MPSC तर्फे 290 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध title=

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची (2021) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विभिन्न विभागाअंतर्गत विभिन्न संवर्गातील एकूण 290 पदांच्या भरती करीता परीक्षा घेण्यात येणार आहे.

शासकीय भरतीसाठी MPSC तर्फे विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. त्यात महत्वाची मानली जाणारी राज्य सेवा परीक्षेची जाहिरात आयोगाने जारी केली आहे. या जाहिरातीमध्ये 290 पदांची भरतीची माहिती देण्यात आली आहे. 

पदे.

  • उपजिल्हाधिकारी गट अ
  • पोलिस उपाधिक्षक गट अ
  • सहाय्यक राज्य कर आयुक्त गट अ
  • गट विकास अधिकारी व तत्सम पदे गट अ
  • सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ 
  • उद्योग उप-संचालक गट अ 
  • सहाय्यक कामगार आयुक्त गट अ
  • उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे गट ब 
  • कक्ष अधिकारी गट ब
  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब
  • सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब
  • सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब
  • उपाधिक्षक भूमि अभिलेख गट ब
  • उपाधिक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब
  • कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता मार्गदर्शन अधिकारी गट ब
  • सरकारी कामगार अधिकार गट ब

वरील पदांसाठी आयोगाने जाहिरात जारी केली असून राज्य सेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतून उमेदवारांची निवड होणार आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबरपर्यंत आहे. आजपासून उमेदवार अर्ज भरू शकतात.