कांदा दरावरुन व्यापाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण

कांद्याच्या दरावरून एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येवला बाजार समितीच्या आवाराबाहेर घडला. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 3, 2018, 08:51 PM IST
कांदा दरावरुन व्यापाऱ्याची शेतकऱ्याला मारहाण  title=
संग्रहित छायाचित्र

नाशिक : कांद्याच्या दरावरून एका शेतकऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी येवला बाजार समितीच्या आवाराबाहेर घडला. 

कांदा खाली करण्यास नकार

कांद्याच्या प्रतिवरून व्यापाऱ्यांने कांदा खाली करण्यास नकार दिला. तसेच व्यापाऱ्याने शेतकऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत शेतकऱ्याला दुखापत झाली असून त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

बाजार समिती प्रशासनाने हात वर केले

 दोन दिवस बाजार समितीची सुट्टी असल्याने हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. बाजार समिती प्रशासनाने हा व्यापारी आपल्याकडील नसल्याचे सांगितले. तर या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.