दरोडेखोरांची वृद्ध दांपत्याला मारहाण, वृद्ध पती जागीच ठार

दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज लुटला

Updated: Sep 18, 2018, 03:48 PM IST
दरोडेखोरांची वृद्ध दांपत्याला मारहाण, वृद्ध पती जागीच ठार title=

पुणे : जिल्ह्यातील डोंगरगावमध्ये रात्रीच्या वेळी दरोडेखोरांनी वृद्ध दांपत्याला मारहाण करत लाखोंचा ऐवज लुटल्य़ाची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात वृद्ध पती जागीच ठार झाला तर वृध्द पत्नी गंभीर जखमी आहे. हल्ल्यात केरबा भिवा गडदे या 65 वर्षींय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमी पत्नी मुक्ताबाई गडदे यांच्यावरत पुण्यातील ससून हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.