VIDEO : एक्सप्रेस वेवर गारांचा पाऊस पडल्याची अफवा

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या आखी वादळामुळे कोकण किनारपट्टी व मुंबई भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Dec 5, 2017, 02:19 PM IST
VIDEO : एक्सप्रेस वेवर गारांचा पाऊस पडल्याची अफवा title=

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी वादळामुळे कोकण किनारपट्टी व मुंबई भागाला धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

 तसेच या वादळामुळे विविध भागात हवा सुटली असून पाऊस पडत आहे.  सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुढचे तीन दिवस मुंबईत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या माहितीबरोबरच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 हा व्हिडिओ होतोय व्हायरल

 या व्हिडिओमध्ये एक्सप्रेस वेवर गारांचा पाऊस पडत असल्याची अफवा पसरवली जात आहे. मोठ्या प्रमाणात गारा पडत असल्याचे या व्हिडीओ मध्ये दिसत आहे. मात्र हा व्हिडीओ एक्सप्रेस वेवरील नसून कुठला तरी बाहेरचा असल्याची माहिती एक्सप्रेस वेच्या नियंत्रण कक्षाने तसेच आयआरबीच्या सुरक्षा विभागाने दिली आहे.  नागरिकांनी या अफवेवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

 
या बेमोसमी पावसाळामुले वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोणावळ्या बरोबरच मुंबईतील सी लिंकवरचा देखील एक फेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही मॅसेज फॉरवर्ड करताना त्याची पडताळणी करावी. 

या पावसामुळे समुद्रात सुमारे पाच ते साडे पाच मीटरच्या लाटा उसतील.  त्यामुळे चक्रीवादळ, पाऊस आणि भरतीची वेळ एकत्र जुळून आल्यास मुंबईकरांच्या त्रासात वाढ होईल.