आता रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून बंद

Coronavirus in Raigad : कोरोनाचा धोका वाढल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Updated: Jan 5, 2022, 02:26 PM IST
आता रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आजपासून बंद title=
संग्रहित छाया

अलिबाग : Coronavirus in Raigad : कोरोनाचा धोका वाढल्याने रायगड जिल्हा प्रशासनाने सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच याची अमलबजावणी करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

एकाच शाळेत 15 विद्यार्थी, 2 शिक्षकांना कोरोनाची लागण

कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, 10 वी आणि 12 वीचे वर्ग कोविड नियमांचे पालन करत सुरू राहणार आहेत. कोविडचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतोय त्याचबरोबर महाड तालुक्यातील विन्हेरे हायस्कुलमधील 15 विद्यार्थी आणि 2 शिक्षकाना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्शवभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. 

सर्व शाळांमधील पहिली ते नववी तसेच अकरावीचे वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद राहतील. मात्र बोर्डाची परीक्षा असल्याने 10 वी आणि 12 वीचे वर्ग कोविडच्या नियमांचे पालन करून सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.