नागपूरमध्ये उद्या पाणी कपात; या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

महापारेषणतर्फे देखभाल व दुरुस्तीच्या काम हाती घेण्यात येणार आहे

Updated: Aug 23, 2022, 08:08 PM IST
नागपूरमध्ये उद्या पाणी कपात; या भागात पाणीपुरवठा राहणार बंद title=

नागपूर शहरातील आठ जलकुंभांचा पाणीपुरवठा बुधवारी बाधित होणार आहे. महापारेषणतर्फे (MahatransCo) देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी 132 के वी मनसर सब स्टेशन येथे चार तासांचे शटडाऊन करण्यात येणार आहे.  बुधवारी सकाळी 6 ते 10 या वेळेत  हे काम हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळे महापारेषणच्या चार तासाच्या शटडाऊनमुळे नागपूर महानगरपालिका आणि  नवेगाव खैरी पंपिंग स्टेशन संपूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे नवेगाव-खैरी गोधनी पेंच येथे चार तास पाणी पुरवठा होणार नाही. 

तसेच गोधनी पेंच हे जलशुद्धीकरण केंद्र देखील बुधवारी सकाळी 6 ते 10 पर्यंत बंद राहणार आहे. महापारेषण शटडाऊन कामामुळे आशी नगर, लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर व नेहरू नगर झोन्समधील ८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील.   

या भागात राहणार पाणीपुरवठा बंद

नारा जलकुंभ : निर्मल सोसायटी, आराधना कॉलोनी, शंभू नगर, शिवगिरी लेआऊट, नूरी कॉलोनी, तवक्कल सोसायटी, आर्य नगर, ओम नगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवी नगर, प्रीति सोसायटी  

 नारी/जरीपटका जलकुंभ : भीम चौक, हुडको कॉलोनी, नागार्जुना कॉलोनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, ख़ुशी नगर, LIG कॉलोनी, MIG कॉलोनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहानुजी नगर लक्ष्मी नगर

नवे जलकुंभ : सुरेंद्र नगर, देव नगर, सावरकर नगर, विवेकानंद नगर, विकास नगर, हिंदुस्तान कॉलोनी, प्रगती नगर, गजानन नगर, सहकार्य नगर, समर्थ नगर (पूर्व व पश्चिम), प्रशांत नगर, संपूर्ण अजनी भाग, उरुवेला कॉलोनी, राहुल नगर, नवजीवन कॉलोनी, छत्रपती नगर पावर हाऊसजवळ, कानफाडे नगर, विश्राम नगर, संताजी नगर, नरगुंदकर लेआऊट, LIC कॉलोनी 

धंतोली जलकुंभ : धंतोली, काँग्रेस नगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम. 

ओंकार नगर 1 व 2 जलकुंभ : रामटेके नगर, रहाटे नगर टोली, अभय नगर, गजानन नगर, जोगी नगर, पार्वती नगर, भीम नगर, जय भीम नगर, जयवंत नगर, शताब्दी नगर, कुंजीलालपेठ, हावरापेठ, बालाजी नगर, चंद्र नगर, नालंदा नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट  

म्हाळगी नगर जलकुंभ : सन्मार्ग नगर, अन्नपूर्णा नगर, नवे नेहरू नगर स्लम, विघ्नहर्ता नगर, संतोषी नगर, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर, जानकी नगर, न्यू अमर नगर, विज्ञान नगर, गुरुकुंज नगर, म्हाळगी नगर, गजानन नगर, प्रेरणा नगर, सूर्योदय नगर, महालक्ष्मी नगर, महात्मा गांधी नगर, अष्टविनायक कॉलोनी, राधाकृष्ण नगर, शिवाजी नगर, मां भगवती नगर

श्री नगर जलकुंभ : श्री नगर, सुंदरबन, ८५प्लॉट, सुयोग नगर, साकेत नगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे लेआऊट, PMG सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबी नगर, म्हाडा कॉलोनी 

नालंदा नगर जलकुंभ : जय भीम नगर, पार्वती नगर, ज्ञानेश्वर नगर, कैलास नगर, बालाजी नगर, चंद्र नगर, नाईक नगर, मित्र नगर, गजानन नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट, नालंदा नगर, बँक कॉलोनी