ठाणे : ठाणे जिल्ह्यात काही भाग वगळता तुर्तास तरी वाईनशॉप उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी न देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व आयुक्त आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक पार पडली. ठाणे ग्रामीण भागात काही ठिकाणी मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. सर्व आयुक्तांती तुर्तास दारु विक्रीला परवानगी द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता आणखी वाट बघावी लागणार आहे.
आज राज्यात अनेक ठिकाणी मद्यविक्रीला सरुवात झाली. वाईनशॉप बाहेर लोकांनी सकाळपासूनच मोठ्या रांगा लावल्या होत्या. पण यावेळी लोकांनी नियमांची पायमल्ली केली. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. अखेर अनेक ठिकाणी पुन्हा वाईनशॉप बंदी करावी लागली. ठाणे जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. सध्या येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे.