राज्यात रिक्षा-टॅक्सीचालकांची 'नो मास्क नो सवारी' मोहीम

महाराष्ट्र राज्यात अनलॉकिंगनंतर प्रवासावरील बंधने हळूहळू दूर होत आहेत. पण कोरोनाचा प्रसारही वेगाने होत आहे. 

Updated: Oct 7, 2020, 09:53 PM IST
राज्यात रिक्षा-टॅक्सीचालकांची 'नो मास्क नो सवारी' मोहीम   title=

मुंबई : राज्यात अनलॉकिंगनंतर प्रवासावरील बंधने हळूहळू दूर होत आहेत. पण कोरोनाचा प्रसारही वेगाने होत आहे. हे पाहता आता अनेक शहरांमध्ये नो मास्क नो एन्ट्रीसारखे प्रयोग सुरु करण्यात आलेत. चंद्रपूर शहर वाहतूक नियंत्रण विभागाने 'नो मास्क नो सवारी' हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. 

या अंतर्गत मास्क न घातलेल्या प्रवाशाला वाहनात प्रवेश न देण्याचे निर्देश रिक्षा-टॅक्सीचालकांना देण्यात आलेत. याचे पालन केले नाही तर दंडात्मक कारवाई केली जाईल. तर दुसरी कडे नो मास्क नो एन्ट्री असं सांगत कल्याण डोंबिवलीमध्ये कोकण विभाग रिक्षा महासंघानेही पुढाकार घेतला आहे. प्रवासी आणि रिक्षाचालक दोघांनाही मास्क बंधनकारक असेल, तेव्हा सर्वांनी या नियमाचं पालन करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.

तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघानेचे 'नो मास्क नो एन्ट्री' ही मोहीम राबवण्यासाठी पुढाकार घेतलाय. कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत रिक्षा संघटनेतर्फे या ''नो मास्क नो एंट्री'' उपक्रमाची घोषणा करण्यात आली. चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल नसेल तर अशा व्यक्तीला रिक्षात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवाशांनीही रिक्षा चालकानेही मास्क घातलेला नसल्यास त्याला मास्क घालण्यास प्रवृत्त करण्याचे आवाहन रिक्षा संघटनेने केले आहे. 

दोनदा जनता कर्फ्यू लागू करूनही चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजारांच्या पुढे पोहोचलाय. आता तर सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाल्याने वेगाने संक्रमण होऊ शकतं हे पाहता वाहतूक नियंत्रण विभागाने 'नो मास्क नो सवारी' हे अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या अंतर्गत मास्क न घातलेल्या प्रवाशाला वाहनातच प्रवेश न देण्याचे निर्देश रिक्षा-टॅक्सीचालकांना देण्यात आलेत. ७ दिवसांच्या जनजाग-तीनंतरही जर रिक्षा-टॅक्सीचालकांनी याचे पालन केले नाही तर दंडात्मक कारवाई केली जाईल.