नागपूर : पोलिसांच्या सीसीटीव्ही सर्विलिएन्स योजनेला नागपूरचे चोरटे वारंवार धक्का देत आहेत. सेफ एंड स्मार्ट नागपूर या योजनेअंतर्गत सर्व मुख्य रस्ते, चौक आणि जास्त गुन्हे प्रमाण असलेल्या भागात अत्याधुनिक CCTV कॅमेरे लावले जात आहे. एलएन्डटी कंपनी कॅमेरे लावण्याचे काम करत आहे.
मात्र, लावलेले कॅमेरे किंवा त्याच्याशी संबंधित यंत्रणा चोरी होण्याचे प्रकार नागपुरात घडत आहे. २ महिन्यांपूर्वी अनंतनगर भागात लावण्यात आलेले २ अत्याधुनिक कॅमेरे चोरीला गेले होते. तर आता नरेंद्रनगर भागात दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनामध्ये CCTV कॅमेऱ्याच्या तब्बल ७ बॅटरीज चोरीला गेल्या आहेत.
बॅटरीज चोरीला गेलेल्या दोन्ही ठिकाणी चोरट्यानी खाम्बावर लावलेल्या सीसीटीवी कैमेरे तसेच राहु देत खाली त्याच्या डीपी मधून अत्यंत महागड्या बैटरीज चोरुन नेल्या आहेत. अजनी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्यात आली असून पोलिस तपास करत आहे. गुन्हेगारावर नजर ठेवण्यासाठी लावलेले कैमरे आणि संबंधित यंत्रणाच आता चोरीला जात असल्यामुळे नागपुरात चर्चा सुरु झाली आहे.