ब्युरो रिपोर्ट : निसर्ग चक्रीवादळ समुद्र किनाऱ्यावर धडकलं. पण चक्रीवादळ धडकण्याआधीच कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहू लागले आणि समुद्राला उधाण आलं. चक्रीवादळ धडकल्यानंतरही जोरदार वारा आणि पाऊस कायम राहिला. रायगड आणि रत्नागिरीत समुद्राला उधाण आलं. दरम्यान, चक्रीवादळ दक्षिणेकडे सरकल्याने मुंबईवरचा मोठा धोका मात्र टळला.
मुंबईत सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस आणि मोकळा मरिन ड्राईव्ह...एक ऐतिहासिक क्षण #CycloneNisargaUpdate@zee24taasnews pic.twitter.com/miJry3jl4z
— Krishnat Patil (@patilkrishnat) June 3, 2020
मुंबईसह कोकणात मोठ्या वादळी वाऱ्यांनी अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. कोकणात अनेक ठिकाणी घरांची छप्पर आणि पत्रेही उडाले. मुंबईतही काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण किनारपट्टीवरील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.
#CycloneNisarga #NisargaCyclone चा #Mumbai मध्ये अजिबात प्रभाव नाही
नरिमन पॉईंटला नेहमीसारखा पाऊस - वारा सुरू pic.twitter.com/LD22pkzu7Q
— अमित जोशी (@amitjoshitrek) June 3, 2020
मुंबईत पश्निम उपनगरातही वारा आणि पाऊस सुरु झाला होता.
निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ धडकल्यानंतर मुंबईत काय होईल याची चिंता होती. मुंबईत समुद्रकिनारी वार्याचा वेग थोडासा वाढला होता, तर पावसाचा जोरही वाढला होता. दुपारी ३.३० वाजताची जुहू बीचवरील हा व्हिडिओ.@zee24taasnews pic.twitter.com/EavPquTxMV
— Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) June 3, 2020
निसर्ग वादळाचा सर्वात जास्त तडाखा रायगडच्या किनाऱ्यावर बसत आहे. अलिबागपासून दक्षिण किनाऱ्यावर श्रीवर्धन दिवेआगार येथे वादळ धडकले. रायगडच्या किनाऱ्यावर यावेळी जोरदार वादळाने दणका दिला. वादळ आल्यानंतर रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊसही सुरु झाला. जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे रायगडात अक्षरशः संचारबंदीचं वातावरण होतं. अर्थात प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना घराबाहेर पडू नका असे आवाहनही केले होते. तसेच हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविले होते.
#WATCH Tin roof atop a building in #Raigad blown away due to strong winds as #CycloneNisarga lands along #Maharashtra coast (Source: NDRF) pic.twitter.com/INlim5VG1c
— ANI (@ANI) June 3, 2020
रत्नागिरी जिल्ह्यातही जोरदार वारे वाहत होते. अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे, छप्पर उडाले. झाडंही पडली. रत्नागिरी जिल्ह्यातही किनारपट्टीभागात जोरदार पाऊस बरसला.
#WATCH Maharashtra: Strong winds and high tides hit Ratnagiri area. #CycloneNisarga pic.twitter.com/Cg85bxwMdL
— ANI (@ANI) June 3, 2020
सिंधुदुर्गातही जोरदार वारे वाहत होते. किनारपट्टी भागात पाऊस आणि जोरदार वारे वाहत होते.
#WATCH Effect of #NisargaCyclone in Sindhudurg District of Maharashtra: India Meteorological Department, IMD pic.twitter.com/vyB8Qoa1mv
— ANI (@ANI) June 3, 2020
पालघर जिल्ह्यात मात्र निसर्ग चक्रीवादळाचा फारसा परिणाम जाणवला नाही. समुद्रही शांत होता आणि पावसानेही पाठ फिरवली होती. मात्र पालघर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर जिल्ह्यातील सातपाटी गावातील ही दृष्य दुपारी 3 वाजताची, समुद्र सध्यातरी शांत आहे, वारा जोरानं वाहत नाही आणि पाऊसही नाही. #पालघर #निसर्गचक्रीवादळ @zee24taasnews pic.twitter.com/7VgauFeOsa
— megha kuchik (@meghakuchik1) June 3, 2020
कोकणात पुढचे काही तास वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
नाशिक विभागातील काही जिल्ह्यातही पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.