निसर्ग चक्रीवादळ तडाखा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज कोकण दौऱ्यावर.

Updated: Jun 13, 2020, 07:02 AM IST
निसर्ग चक्रीवादळ तडाखा : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात कोकण दौऱ्यावर  title=

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज शनिवारी एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत. सकाळी ८.३० वाजता महसूलमंत्री हे शासकीय निवासस्थान रॉयलस्टोन येथून मोटारीने निघून ९.०० वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचतील त्यानंतर रोरो बोटीने मांडवा जेट्टी येथे जातील तेथून मोटारीने अलिबाग तालुक्यातील नागांव व चौल गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर काशीद व नंतर मुरुड येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील.

दुपारी १.१० वाजता महसूलमंत्री अधिकऱ्यांशी चर्चा करणार आहेत त्यानंतर आगरदांडा येथे आगमन व रोरो बोटीने दिघी बंदराकडे प्रयाण करतील त्यानंतर दिवे आगार, तुरुंवडी या भागातील नुकसानीची पाहणी महसूलमंत्री करतील व ४.३० वाजता मोटारीने मुंबईकडे प्रयाण करतील.

दरम्यान, याआधी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौरा केला होता. त्यानंतर शरद पवार यांनी दोन दिवस कोकणचा दौरा केला. पवारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दौरा करत राज्य सरकावर टीका केली. राज्याची प्रत्यक्षात मदत वादळग्रस्तांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला आहे. आता काँग्रेसचे मंत्री थोरात कोकण दौऱ्यावर जात आहेत.