राज्यात 'या' महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करायची शिक्षण विभागाची तयारी

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राज्यातल्या शाळा नियोजित वेळेत सुरू होऊ शकल्या नाहीत. 

Updated: Jun 12, 2020, 10:12 PM IST
राज्यात 'या' महिन्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू करायची शिक्षण विभागाची तयारी title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे राज्यातल्या शाळा नियोजित वेळेत सुरू होऊ शकल्या नाहीत. पण आता शाळा जुलैपासून सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी आहे. शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात आली आहेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. 

काय आहेत मार्गदर्शक तत्त्व?

- शाळा  सुरू करण्यापूर्वी एक महिना सदर गावात कोरोनाच्या एकही रुग्ण नसेल याची खात्री करून शाळा सुरू होणार

- जिथे महिनाभरात एकही रुग्ण आढळला नाही तिथले नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग १ जुलैपासून सुरू करण्याची तयारी

- सरसकट शाळा सुरू होणार नाहीत

- सहावी ते आठवीचे वर्ग  ऑगस्टपासून सुरू करण्याची तयारी

- पहिली ते पाचवीचे वर्ग सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी

- अकरावीचे वर्ग दहावीचा निकाल लागल्यानंतर आधी प्रवेश प्रक्रिया होणार. ती पूर्ण झाल्यावर वर्ग सुरू करण्याची तयारी

- विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आड वर्ग भरवण्याचीही मुभा

- शाळा सुरू करण्यापूर्वी त्यांनी सॅनिटायझेशन करणे बंधनकारक

- प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवण्याची अट

- शिक्षक विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची अट

- शिक्षण विभागाचं हे वेळापत्रक संभाव्य स्वरुपाचं असून स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन त्याप्रमाणे शाळा सुरू करण्याचं नियोजन करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.