वाशीम : पीक कर्ज वाटपाच्या नावानं सध्या राज्यात गोंधळ सुरु आहे.. कागदपत्रांची पूर्तता, अर्जातील त्रूटी अशा कारणांमुळे शेतकऱ्यांना बँकांचे उंबरठे झीजवावे लागतात.. मात्र वाशीम जिल्ह्यात काहीसं वेगळं चित्र आहे.. जिल्हाधिकाऱ्यांनी मनावर घेतलं तर काय घडू शकतं हे आता आपण पाहाणार आहोत.
शेतकऱ्यांना सुलभ पीक कर्ज उपलब्ध व्हावं म्हणून वाशीम जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीये.. यासाठी शेतकऱ्याना www.collectorwashim.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आलंय.. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना घरबसल्या किंवा शेतातही संगणक किंवा मोबाईल द्वारे अर्ज भरता येतोय.. अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची सर्व माहितीही शेतकऱ्यांना एका क्लीकवर उपलब्ध होतीये..