पुण्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरलाच-शिवतारे

पुरदंरच्या विमातळाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. 

Updated: Sep 23, 2017, 11:10 PM IST
पुण्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरलाच-शिवतारे title=

पुणे : पुण्यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरलाच होणार आहे. येत्या तीन महिन्यात प्रत्यक्ष भू संपादनाला सुरवात होईल, अशी माहीती राज्यमंत्री आणि पुरदंरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली आहे. 

पुरंदर विमानतळाला लष्कराने काही आक्षेप घेतले होते. त्यामुळं पुरंदरला विमानतळ होणार का?, या विषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.  मात्र, लष्कर आणि हवाईदलाचे सर्व शंकांचे निरसन झाले आहे. त्यामुळं पुरदंरच्या विमातळाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.