नागपूर : राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यात आल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केलीय.
आता, क्रिमिलेअर मर्यादा सहा लाखांवरून आठ लाखांवर करण्यात आलीय. ओबीसी मंत्री राम शिंदे यांनी विधानसभेत ही घोषणा केलीय.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा ओबीसी, एसबीसी, एनटी वर्गाला फायदा मिळणार आहे. केंद्र सरकारनं वाढवलेल्या क्रिमिलेअर मर्यादेच्या धर्तीवर राज्य सरकारकडून ही घोषणा करण्यात आलीय.