राज्यपाल कोशारींचं धोतर फाडणा-याला 1 लाखांचं बक्षीस; पुण्यात लागले बॅनर्स

राज्यपाल यांच्या या वक्तव्या विरोधात आता संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आक्रमक झाल्या आहत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने थेट बक्षीस जाहीर करत आपला निषेध नोंदवला आहे.  

Updated: Nov 20, 2022, 06:18 PM IST
राज्यपाल कोशारींचं धोतर फाडणा-याला  1 लाखांचं बक्षीस; पुण्यात लागले बॅनर्स  title=

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : राज्यपाल कोशारींचं धोतर फाडणा-यास राष्ट्रवादी 1 लाखांचं बक्षीस देईल अशी पोस्टर्स पुण्यात लागली आहेत. राज्यपाल भगसिंग कोश्यारी(Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादीने हे बक्षीस जाहीर केले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या मुख्य पाच चौकामध्ये असे बॅनर लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निषेध केला आहे. 

औरंगाबाद मध्ये राज्यपाल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत. आता नवे आदर्श गडकरी आणि शरद पवार हे तुमच्यासमोर बसले आहेत असं वक्तव्य कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांसमोर केले. राज्यपाल यांच्या या वक्तव्या विरोधात आता संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आक्रमक झाल्या आहत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने थेट बक्षीस जाहीर करत आपला निषेध नोंदवला आहे.  

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी हे वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी नेहमी चर्चेत असतात काल औरंगाबाद मधील विद्यापीठातील कार्यक्रमात त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान कारक बोलल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापची लाट उसळली आहे. 

अशातच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंह कोशारीयांचे धोतर फेडणाऱ्या वर १ लाखांचे बक्षीस ठेवले आहे. उचलत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा जाहीर निषेध असे या बॅनरवर लिहिण्यात आले आहे.