...तर दारात जनावर बांधायला लावीन; राष्ट्रवादीचे आमदार कृषी पंपाच्या वीज तोडणी वरून भडकले

पिण्याचं पाणी आणि जनावराचं पाणी जर बंद केलं तर तुमच्या दारात जनावरं बांधायला लावेल असा सज्जड इशाराचा आमदार दत्तात्रय भरणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

Updated: Nov 23, 2022, 09:26 PM IST
...तर दारात जनावर बांधायला लावीन; राष्ट्रवादीचे आमदार कृषी पंपाच्या वीज तोडणी वरून भडकले title=

जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर :  कृषी पंपाच्या वीज तोडणी(power cut of agricultural pump) वरून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे(NCP MLA Dattatraya Bharane ) चागंलेच संतापले आहेत.  पिण्याचे आणि जनावरांचे पाणी बंद कराल तर दारात जनावर बांधायला लावीन असा गंभीर इशाराच भरणे यांनी दिला आहे. वीज वसुलीमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. 

सध्या इंदापूर तालुक्यात थकीत आणि चालू वीज बिलाच्या वसुलीवरून शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरू आहे. या संदर्भात आमदार दत्तात्रय भरणे यांनी महावितरणचे अधिकारी आणि शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत आमदार दत्तात्रय भरणे देखील उपस्थित होते.

या बैठकीत भरणे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. पिण्याचं पाणी आणि जनावराचं पाणी जर बंद केलं तर तुमच्या दारात जनावरं बांधायला लावेल असा सज्जड इशाराचा आमदार दत्तात्रय भरणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. 

दुसरीकडे शेतकरी नेते रविकांत तुपकर देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रश्नी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागलणारा वीज पुरवठा सुरळीत ठेवावा. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करु नये अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.