शरद पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण

'जेजुरी गडावरील अहिल्यादेवींचा पुतळा भाविकांना प्रेरणा देत राहिल.

Updated: Feb 13, 2021, 09:35 PM IST
शरद पवारांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण title=

जेजुरी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी सुरू केलेल्या दाव्यावर दुर्लक्ष करत शरद पवार यांनी अनावरण केलं आहे.  जेजुरीत शरद पवारांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. 

'जेजुरी गडावरील अहिल्यादेवींचा पुतळा भाविकांना प्रेरणा देत राहिल. अहिल्यादेवींनी स्त्री शक्तीचं महत्त्व पटवून दिलं', असं शरद पवारांनी आपल्या यावेळी उपस्थितांना सांगितलं. त्याच दरम्यान या सोहळ्याला छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. मराठा समाजासोबतच धनगर आणि बहुजन समाजासाठीही काम करीत राहणार, असं छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी सांगितलं.

जेजुरी गडावर गोपिचंद पडळकर यांनी गनिमी कावा करत शुक्रवारी पहाटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. मात्र पुतळ्याचं अनावरण झाल्याचा दावा पडळकरांनी केला. त्यावरून वादाला तोंड फुटणार का? असा सवाल उपस्थित होत होता. तर पुतळ्याचं अनावरण झालं आहे त्यामुळे शरद पवारांनी ते करू नये असं आव्हान देखील दिलं होतं.

पडळकरांच्या आव्हानाला न स्वीकारता शरद पवार यांनी अनावरण केलं आहे. तर त्यावरून आता राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ विरुद्ध पडळकर असा नवीन वाद सुरू होतो का अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

हसन मुश्रीफ यांनी पडळकर आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विखारी टीका केली आहे. पडळकरांचा बोलवता धनी फडणवीस आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली.