'रिचार्जवर चालणारी बाई'... अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप

रिचार्जवर चालणारी बाई...  असं म्हणत  सूरज चव्हाण यांची अंजली दमानियांवर खालच्या भाषेत टीका केली आहे.  अंजली दमानियांची अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाणांबाबत तक्रार करणार आहेत. 

वनिता कांबळे | Updated: May 29, 2024, 04:42 PM IST
'रिचार्जवर चालणारी बाई'... अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप   title=

Anjali Damania On Ajit Pawar : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. अंजली दमानिया आणि राष्ट्रावादी यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.  अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीने गंभीर आरोप केले आहेत. रिचार्जवर चालणारी बाई... असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ता सुरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केलेत. एका विशिष्ट गटाच्या इशाऱ्यावर दमानिया काम करत आहेत. लवकरच त्यांचे सर्व कॉल डिटेल्स तसेच त्या कुणाला भेटल्या याची माहिती प्रसिद्ध करणार असल्याचे सुरज चव्हाण म्हणाले.  

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले असून पुण्याला जाऊन सर्व पुरावे सादर करणार असल्याचे त्या म्हणासल्या. पुणे कल्याणीनगर कार अपघात प्रकरणी अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत.अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केला होता का? असा आरोप अंजली दमानियांनी केलाय. त्याचबरोबर पुणे पोलीस आयुक्तांनी ताबडतोब खुलासा करावा अशी मागणी अंजली दमानियांनी केली. अजित पवारांनी फोन केला असेल तर तातडीने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी अंजली दमानियांनी केली.

या  प्रकरणात  अजित पवारांची नार्को टेस्ट करा, त्यांचा फोनही चेक करा, अशी मागणी अंजली दमानियांनी केली.  पत्रकार परिषदेमध्ये ते गांगरल्यासारखे वाटत होते, असं त्या म्हणाल्या. आपण कोणालाही फोन केला नसल्याचं अजित पवारांनी म्हटल आहे. त्याचबरोबर कोणत्याही दबावाला बळी पडू नका अशा सूचनाही पोलिसांना दिल्याचं अजित पवार म्हणालेत.

अंजली दमानिया आणि सुरज चव्हाण यांच्यात जुंपली 

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी झी 24 तासला प्रतिक्रिया देताना अंजली दमानिया आणि सुरज चव्हाण यांच्यात चागंलीच जुंपली  अजित पवारांची नार्को टेस्ट झालीचत पाहिजे. ज्यांनी अजित पवारांना वाढवल. ज्यांनी त्यांना मोठं केले त्यांच्यासोबत अजित पवार राहू शकले नाहीत तर ते जनतेसोबत काय एकनिष्ठ राहणार अस अंजली दमानिया म्हणाल्या. रिचार्जवर चाणारी बाई...  असं म्हणत  सूरज चव्हाण यांची अंजली दमानियांवर खालच्या भाषेत टीका केली. दमानिया सुपारी घेऊन काम करतात. एक विशिष्ट गटाची बाजू घेऊन दमानिया बोलत आहेत असा आरोप सुरज चव्हाण यांनी केला.