नवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक

शिविगाळ करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक करण्यात आली आहे.

Updated: Aug 20, 2019, 05:23 PM IST
नवी मुंबईत झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक  title=

नवी मुंबई : वाशीमध्ये वाहतूक पोलिसांना शिविगाळ करणाऱ्या झोमॅटो डिलिव्हरी गर्लला अटक करण्यात आली आहे.  आठ तारखेला या महिलेने आपली बाईट नो पार्किंगमध्ये लावली होती. ड्युटीवर असलेल्या वाहतूक पोलिसांनी या बाईकचा फोटो काढला. त्यावर जाब विचारण्यासाठी ही महिला पोलिसांच्या पाठिमागे गेली आणि अत्यंत शिवराळ भाषेमध्ये आरेरावी करू लागली.

शिवराळ भाषेमध्ये आरेरावी करण्याचा बराचवेळ हा प्रकार सुरू होता. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी वाशी पोलिसांना बोलावून तिला त्यांच्या ताब्यात दिले होते. तिथं उपस्थित असलेल्यांनी हा व्हिडिओ बनवला. तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला. त्यानंतर अखेर आज या झोमॅटो गर्लला अटक करण्यात आली आहे.

नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्याने वाहतूक पोलिसांनी बाईक टोईंग केली. आपली बाईक टोईंग केल्याने झोमॅटोची महिला संतप्त झाली. तिने शिवराळ भाषा वापरली. या महिलेला सानपाडा पोलिसांनी अटक केली. पोलिसाने कारवाई करण्यासाठी गाडीचे छायाचित्र काढले. त्याचवेळी अटक करण्यात आलेल्या महिलाही उभी होती. त्यावेळी तुम्ही माझे छायाचित्र का काढता, असा जाब विचारला आणि पोलिसांनी हुज्जत घातली.