नाशिकच्या महिलेला त्याच्यासोबतचा एक सेल्फी एवढा महागात पडला

मित्रासोबत सेल्फी काढणे एक महिलेला चांगलेच महागात पडले आहे. अनेक वेळा अनोळखी लोकांना सोशल मीडियावर नाकारणे योग्यच असते. कोणतीही ओळख नसताना

Updated: Apr 7, 2022, 11:08 PM IST
नाशिकच्या महिलेला त्याच्यासोबतचा एक सेल्फी एवढा महागात पडला title=

नाशिक : मित्रासोबत सेल्फी काढणे एक महिलेला चांगलेच महागात पडले आहे. अनेक वेळा अनोळखी लोकांना सोशल मीडियावर नाकारणे योग्यच असते. कोणतीही ओळख नसताना कुणीही तुमच्याशी जास्त ओळख वाढवत असेल किंवा जवळीक साधत असेल, तर अशा व्यक्तींपासून सावध राहा. तसेच घडलेला प्रकार आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा आईवडिलांना जास्त नुकसान होण्याआधी समाजावून सांगा, हेच नाशिकच्या महिलेसोबत घडलेल्या घटनेतून स्पष्ट होत आहे.जवळच्या व्यक्तींनीही अशा वेळेस बळी पडण्याआधी त्या व्यक्तीला समजून घेणे महत्त्वाचे आहे

सोशल मीडियावर ओळख करून एका तरुणाने विवाहित महिलेसोबत सेल्फी काढला. हाच सेल्फी पतीला दाखवण्याची धमकी देऊन पीडित महिलेसोबत बळजबरी शारिरिक संबध केल्याची तक्रार पीडित महिलेने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही विवाहित आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सोशल मीडियातील अनेक अँपवर सक्रीय आहे. ही महिला सोशल मीडियातील शेअर चॅट या अँपचा सुद्धा वापर करत होती. याच शेयर चॅटच्या माध्यमातून फिर्यादी महिलेची मुंबईतील एका तरुणासोबत ओळख झाली. 

ही ओळख मैत्रीत बदलली, ही मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली. यानंतर याच शेयर चॅटच्या माध्यमातून एकमेकांना भेटण्याचे ठरले. पहिली भेट ही साई बाबांच्या शिर्डीत करण्याचे ठरले. ठरल्यानुसार दोघेही शिर्डीत भेटले. साहजिकच पहिल्यांदा भेटल्याने सेल्फी तो बनता है. दोघांनी  शिर्डी येथे सेल्फी काढला. 

काही दिवसानंतर मुंबईच्या तरुणाने सेल्फीची धमकी फिर्यादी महिलेला दिली. मला पुन्हा भेट नाहीतर सेल्फी तुझ्या पतीला पाठवेल आणि तुझे लग्न सुद्धा मोडून टाकेल, अशी धमकी देऊन महिलेला भेटण्यासाठी बोलावले. 

वणी आणि त्रंबकेश्वर येथे महिलेला भेटण्यास बोलावून  लॉजवर नेऊन फिर्यादी महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. हा सर्व प्रकार गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात घडल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.